July 7, 2024 6:56 PM July 7, 2024 6:56 PM
18
वरळी इथं झालेल्या हिट अँड रन प्रकरणी योग्य कारवाई होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबईतल्या वरळी इथल्या हिट अँड रन प्रकरणातील कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. कायदा सर्वांसाठी समान असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. वरळीत आज पहाटे साडे पाचच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या एका दांपत्याला गाडीनं दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. ज्या गाडीनं धडक दिली ती शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांच्या मालकीची आहे. अपघात झाला तेव्हा गाडीत त्यांचा मुलगा मिहिर शहा आणि चालक ...