July 25, 2024 7:30 PM July 25, 2024 7:30 PM
8
नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथं कांदा महाबँक सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथं कांदा महाबँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृहात कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. कांद्यावर अणुऊर्जेद्वारे विकिरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक करता येईल. या बँकेमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. या बँकेसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पणन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच...