December 3, 2024 7:12 PM December 3, 2024 7:12 PM

views 28

महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर इथं ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक आज झाली. या बैठकीला राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नागसेन कांबळे हे देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनाची तयारी प्रशासनाच्या वतीनं  करण्यात आली असून त्यात कोणतीही कमतरता जाणवू नये, असे निर्देश मुख्यमंत्री शिं...

November 27, 2024 8:26 PM November 27, 2024 8:26 PM

views 8

राज्यात सत्तास्थापनेबाबत अद्याप निर्णयाची प्रतीक्षा, मुख्यमंत्री आज भूमिका स्पष्ट करणार

मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे, असं शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज ठाण्यात बातमीदारांशी बोलत होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यासाठी आणि सरकार स्थापनेसाठी आपला कोणताही अडसर नाही, कसलीही नाराजी नाही असं आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीद्वारे कळवल्याचं शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या काळात आपली ओळख लाडका भाऊ अशी झाली याचं समाधान आह...

November 21, 2024 3:36 PM November 21, 2024 3:36 PM

views 17

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला भेट

आजच्या म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांनी हौतात्म्य पत्करले होते. त्यांच्या या हौतात्म्याचे स्मरण म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला भेट देऊन शहीद हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हेही उपस्थित होते.  राष्ट्रवादी शरद्चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हुताम्यांना आदरांजली वाहिली आहे. आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध...

November 18, 2024 7:24 PM November 18, 2024 7:24 PM

views 16

महाविकास आघाडीनं अनेक विकासकामांमध्ये अडथळे आणल्यामुळे लाखो रोजगारांवर गदा- मुख्यमंत्री

महाविकास आघाडीनं अनेक विकासकामांमध्ये अडथळे आणल्यामुळे लाखो रोजगारांवर गदा आली असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केला. मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. वाढवण बंदर, जैतापूर, बारसू रिफायनरी अशा अनेक प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. कोविड काळातही महाविकास आघाडीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. त्यामुळे महायुतीचं सरकार आणण्याचा निश्चय जनतेनं घेतला आहे, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. 

November 17, 2024 7:44 PM November 17, 2024 7:44 PM

views 8

‘महायुती सत्तेत आल्यानंतरच राज्य प्रगतीपथावर पुढं गेलं, यानंतरही पुढंच नेऊ’

महायुतीचं सरकार आल्यानंतरच राज्य प्रगतीच्या मार्गावर पुढे गेलं असून, यापुढंही आपण ते पुढंच नेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळ्यात साक्री इथं झालेल्या प्रचारसभेत दिलं. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी आपण केंद्र सरकारची मदत घेतली. त्यानंतर सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार ८९२ रुपये किंमत देण्याचा निर्णय केंद्र शासनानं घेतल्याचं शिंदे यावेळी म्हणाले.    नंदुरबार जिल्ह्यात धडगाव इथंही त्यांनी आज प्रचारसभा घेतली. आचार संहिता संपल्यानंतर मोलगी तालुक्याची निर्मिती करण...

November 15, 2024 6:41 PM November 15, 2024 6:41 PM

views 50

सोयाबीन खरेदीसाठी भावांतर योजना लागू करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

सोयाबीन खरेदी करताना किमान आधारभूत किंमतीतली तफावत दूर करण्यासाठी भावांतर योजना लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिलं. नांदेडमधल्या प्रचारसभेत ते बोलत होते. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी महायुतीच्या आश्वासनांची आठवण उपस्थितांना करुन दिली.    दरम्यान, कांद्याची बेकायदा साठवणूक करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांवर संबंधित अधिनियमांनुसार  कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा तसंच पणन विभागा...

November 13, 2024 6:44 PM November 13, 2024 6:44 PM

views 14

लाडकी बहिण योजना बंद पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पालघरमध्ये प्रचारसभा घेतली. लाडकी बहिण योजना बंद पडावी म्हणून सावत्र भावांनी खूप प्रयत्न केले. मात्र आम्ही ही योजना बंद पडू देणार नाही, असं ते म्हणाले. पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना यावेळी उमेदवारी दिली नसली तरी त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिलं.

November 12, 2024 7:44 PM November 12, 2024 7:44 PM

views 14

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची रवी राणा यांना ताकीद

अमरावती जिल्ह्यातल्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी महायुतीची शिस्त पाळायला हवी, महायुतीविरुद्ध काम करणं चालणार नाही, अशी ताकीद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अमरावतीत भाजपाचे उमेदवार जिंकायला हवेत, बाकीचे पराभूत झाले तरी चालतील, अशा आशयाचं विधान रवी राणा यांनी एका सभेत केलं होतं. त्यासंदर्भात ते बोलत होते.    रवी राणा विनाशकाले विपरित बुद्धी झाल्यासारखं वागत आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. रवी राणा यांच्या भाषेमुळेच त्यांच्या ...

November 12, 2024 7:46 PM November 12, 2024 7:46 PM

views 8

महायुतीने सुरू केलेल्या योजना मविआने बंद पाडण्याचा प्रयत्न केला – मुख्यमंत्री

महायुती सरकारने राज्यात विविध विकासकामं केली. महाविकास आघाडीने सरकारने राज्याला वनवास दिला. पण, महायुतीने सुरू केलेल्या योजना मविआने बंद पाडण्याचा प्रयत्न केला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसोड इथे केली. महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. महायुतीविषयी कुणीही दिशाभूल केली तरी त्याला फसू नये असं आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं.

November 11, 2024 6:47 PM November 11, 2024 6:47 PM

views 18

विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळवू, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं आपली ताकद दाखवून दिली असून, विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळवू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते.    काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवण्यासाठी आम्हाला उठाव करून सत्ताबदल करावा लागला, असं ते म्हणाले. लाडकी बहीण पुढचा हप्ता निवडणूक झाल्यावर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं.    जालना जिल्ह्यात घनसावंगी इथ...