August 17, 2024 10:20 AM August 17, 2024 10:20 AM

views 19

महिला बचतगट आणि महिला उद्योजकांच्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप विकसित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी उमेद, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान-एनयुएलएम, महिला आर्थिक विकास महामंडळ-माविम यांनी एकत्रित येऊन एक व्यासपीठ निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.   शहरांमध्ये बचतगटांची संख्...

August 4, 2024 1:56 PM August 4, 2024 1:56 PM

views 12

अन्य राज्यातील विद्यार्थ्यांनाही आता आयुर्वेदाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी राज्यात प्रवेश मिळणार

अन्य राज्यातून बी ए एम एस केलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुंबईत काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश दिले. या विद्यार्थ्यांना आता राज्याच्या शासकीय आणि खाजग...

August 2, 2024 3:22 PM August 2, 2024 3:22 PM

views 23

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून रुग्णांना ३०१ कोटी रुपये वितरित

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षानं राज्यातल्या हजारो रुग्णांचे प्राण वाचवले असून या योजने अंतर्गत गेल्या २ वर्षं १ महिन्याच्या काळात रुग्णांना ३०१ कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित करण्यात आल्याचं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.   मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या मुंबईतल्या कार्यालयातून आतापर्यंत २७४ कोटींपेक्षा जास्त, तर नागपूर कार्यालयातून २७ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात आलं. या माध्यमातून राज्यातल्या ३६ हजार १८२ गंभीर आजारी रुग्णांचे प्राण ...