November 9, 2024 4:30 PM November 9, 2024 4:30 PM

views 21

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज परभणीत प्रचारसभा

महायुती सरकारच्या काळात सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा शेतकरी, लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांचा होता, असं शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते आज परभणीत प्रचारसभेत बोलत होते.   महायुती सरकारनं साडे सात अश्वशक्ती पम्पाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बील माफ केलं, तसंच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला, असं शिंदे म्हणाले.  

September 28, 2024 3:47 PM September 28, 2024 3:47 PM

views 12

ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या तीर्थदर्शन योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापुरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत या योजनेतील पहिल्या कोल्हापूर ते अयोध्या या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रत्यक्ष उपस्थित होते. या पहिल्या रेल्वेगाडीतून ८०० ज्येष्ठ नागरिक रवाना झाले असून आपली वडीलधारी मंडळी ही आपली जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या योजनेच्या माध्यमातून ६० वर्षावरील सर्व धर्मीय ज्येष्ठांना विविध ठिकाणी ती...

September 22, 2024 9:47 AM September 22, 2024 9:47 AM

views 10

सरकारने पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळे परकीय गुंतवणूक तसंच जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

सरकारने पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळे परकीय गुंतवणूक तसंच एकूण देशांतर्गत उत्पन्न - जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते काल ठाणे इथं मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद-२०२४ या कार्यक्रमात बोलत होते. राज्यातली ५२ टक्के गुंतवणूक मोठी उपलब्धी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं, ते म्हणाले. आपण जे एम ओ युज साईन केले, इंडस्ट्रीज् आली, आपण अनेक सेक्टरमध्ये प्रगती केली त्यामुळे महाराष्ट्र पहिल्य...

September 20, 2024 3:41 PM September 20, 2024 3:41 PM

views 13

विरोधकांनी राज्याला बदनाम करण्याचे धोरणआखल्याची मुख्यमंत्र्यांची टीका

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे राज्यात विविध प्रकल्पांची सुरुवात आणि पायाभूत सुविधांचा विकास होत आहे. मात्र, राज्याला बदनाम करण्याचे धोरण विरोधकांनी आखल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.   नागपूर विमानतळावर काल ते वार्ताहरांशी बोलत होते.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे ते जनतेची दिशाभूल करत असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

September 19, 2024 8:20 PM September 19, 2024 8:20 PM

views 17

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वच्छता ही सेवा’ या राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात

मुंबईमध्ये डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू असून यामुळे मुंबईचं प्रदुषण कमी झालं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी म्हटलं आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ या  राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबईत गिरगाव चौपाटीवरून झाली. हे अभियान २ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून राज्यातल्या नागरी आणि ग्रामीण भागात ‘स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसंच, ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रम...

September 19, 2024 10:23 AM September 19, 2024 10:23 AM

views 18

सेमी कंडक्टर प्रकल्पासाठी राज्य सरकार मदत करत असल्याचं मुख्यमंत्र्यां प्रतिपादन

विकसित भारतात महाराष्ट्र उद्योगमित्र राज्य असून, सेमी कंडक्टर प्रकल्पासाठी राज्य सरकार मदत करत असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नवी मुंबईत केलं. राज्यातल्या पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते.   हा प्रकल्प दोन टप्यात होणार असून इटली आणि फ्रान्स सरकारचा यामध्ये २७ टक्के वाटा आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २४ हजार ५३८ कोटी रुपये गुंवतणूक करण्यात येणार आहे. दोन्ही टप्प्यात महा...

September 17, 2024 10:08 AM September 17, 2024 10:08 AM

views 25

जागतिक कृषी मंचातर्फे पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी राज्य सरकारनं केलेल्या कामाची दखल

जागतिक कृषी मंचातर्फे पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी राज्य सरकारनं केलेल्या कामाची दखल घेण्यात आली आहे. या कामगिरीसाठी उद्या जागतिक बांबू दिनाचं औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान केला जाणार आहे. मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाला 20 देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. पर्यावरण रक्षणासाठी त्वरीत कृतीची साद संयुक्त राष्ट्रांनी दिली होती. त्याला प्रतिसाद देणारा भारत हा पहिलाच देश ठरला असून महाराष्ट्...

September 7, 2024 11:58 AM September 7, 2024 11:58 AM

views 20

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुती सरकारचे प्रमुख असून त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. “मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसून हा निर्णय भाजपाचं संसदीय मंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मिळून घेतील. हा निर्णय निवडणुकीच्या आधी घ्यायचा की नंतर हे तेच ठरवतील, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत कसलाही संभ्रम नाही”, असंही...

September 4, 2024 3:22 PM September 4, 2024 3:22 PM

views 14

पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पिकांचं नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सगळ्या नुकसानाची माहिती घेऊन लवकरात लवकर पंचनामे करावेत तसंच, पुरामुळे तात्पुरतं स्थलांतर केलेल्यांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात असे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.   बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून त्या...

September 4, 2024 10:47 AM September 4, 2024 10:47 AM

views 19

२७ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचा मुंबईत प्रारंभ

ई-गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार प्रवृत्ती बदलण्याचं माध्यम आहे. यामधल्या पारदर्शकतेमुळे सामान्य नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास वाढत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ‘ई-गव्हर्नन्स’ या विषयावरच्या २७व्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना ते काल मुंबईत बोलत होते. ‘विकसित भारत-सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ ही या परिषदेची संकल्पना आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. ई-गव्हर्नन्स हा विकासाचा एक मूलभूत घटक अ...