December 15, 2024 9:26 AM
50
सृजनशील समाजनिर्मितीसाठी वाचन संस्कृती जिवंत ठेवणं काळाची गरज – मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जिवंत ठेवणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केलं. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं पुण्यातल्या फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना, अशा प्रकारचा पुस्तक महोत्सव पुण्यापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं आयोजन केले पाहिजे, याकरीता शासन आपल्या पाठीशी नेहमी उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमं...