December 28, 2024 7:16 PM

views 24

सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यात गुणवत्ता राखण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्याला कृषी, वीज निर्मिती, उद्योग आणि सेवा क्षेत्रात आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी सौर ऊर्जेवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यात गुणवत्ता राखण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अतिथिगृहात  झालेल्या राज्य विद्युत मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस ऊर्जा राज्यमंत्री आणि मंडळाच्या उपाध्यक्ष मेघना बोर्डीकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

December 26, 2024 3:17 PM

views 13

जम्मू-काश्मीरमध्ये शहीद महाराष्ट्रतल्या २ जवानांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर

जम्मू काश्मीरमध्ये पूंछ इथं मंगळवारी झालेल्या एका अपघातात शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातात शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या दोन जवानांच्या कुटुंबांना राज्य सरकारच्या वतीनं १ कोटी रुपये आर्थिक मदत आणि इतर लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.  मराठा रेजिमेंटचे नायक शुभम समाधान घाडगे हे सातारा जिल्ह्यातल्या कामेरी इथले तर, सिपॉय अक्षय दिगंबर निकुरे हे चंद्रपूर जिल्ह्यातल्या पिंपळगाव इथले रहिवासी आहेत.  

December 25, 2024 3:29 PM

views 13

नक्षलवादाविरोधात निकराची लढाई करण्याचा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार

नक्षलवादाविरोधात निकराची लढाई करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत बोलत होते. गडचिरोली ही भारताची दुसरी स्टील सिटी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मागच्या कार्यकाळात आपण विदर्भात सिंचनाचे 80 प्रकल्प पूर्ण केले याशिवाय पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्राचे प्रकल्प देखील पूर्ण केले. ऊर्जा विभागाचा मंत्री म्हणून त्या क्षेत्रातल्या पुढच्या पंचवीस वर्षाचा रोड मॅप तयार असल्याचा उल्लेख त्यांनी केला. पुढच्या दोन वर्...

December 24, 2024 6:43 PM

views 11

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानावरुन काँग्रेसचं राजकारण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची स्मृती जपण्याचं काम केंद्र सरकार आणि भाजपाने केलं आहे मात्र काँग्रेसने त्यांना कोणताही सन्मान दिलेला नाही. त्यांना निवडणूकीत पराभूत केलं. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानावरुन काँग्रेसने राजकारण केलं असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केला. ते नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. 

December 24, 2024 8:05 PM

views 18

हरित उर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील – मुख्यमंत्री

राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारी सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून राज्यातले शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातल्या उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातल्या नारंगवाडी या गावातल्या प्रकल्पांचं लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांना 16 हजार मेगावॅट इतकी वीज पुरवणारे सर्व फीडर स...

December 22, 2024 1:59 PM

views 43

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल जाहीर झालं. गृह आणि ऊर्जा खातं तसंच विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त आणि नियोजन तसंच राज्य उत्पादन शुल्क खातं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खाते (सार्वजनिक उपक्रम) देण्यात आलं आहे. जलसंपदा विभागाची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडे विभागून देण्यात आली आहे. चंद्रशेखर बा...

December 19, 2024 8:17 PM

views 21

राज्यातल्या नागरिकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज्यातल्या, शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यात १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत. आतापर्यंत ६६७ मेगावॅट वीज कार्यान्वित झाली. २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट वीज कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांकडून विजेचे बिल घेणार नाही, असं ते म्हण...

December 16, 2024 6:22 PM

views 17

विरोधकांनी मांडलेल्या कोणत्याही विषयावर चर्चा करायला सरकार तयार-देवेंद्र फडनवीस

विरोधकांनी मांडलेल्या कोणत्याही विषयावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज स्पष्ट केलं. ते नागपुरात विधिमंडळाच्या पायऱ्यावर बातमीदारांशी बोलत होते. सरकार कुठलीही माहिती लपवून ठेवणार नाही, असं ते म्हणाले.    सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नसल्याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की पक्ष आणि सरकार हे दोन्ही महत्त्वाचे असतात. काहींना पक्षाची जबाबदारी देण्यासाठी मंत्रिमंडळात सामावून घेतलं जात नाही. असं फडनवीस म्हणाले.

December 16, 2024 3:06 PM

views 32

बीड हत्या प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीडमधील सरपंच हत्या प्रकरण आणि परभणीमधील आंबेडकरी कार्यकर्त्याच्या कोठडीमधील मृत्यूप्रकरणविषयी मुद्दा उपस्थित केला. सरकारने याबाबत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.    त्यावर या संदर्भात चर्चा करू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं.  बीडमधील हत्या प्रकरणी तीघांना अटक करण्यात आली असून जे सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. तसंच, हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण...

December 16, 2024 9:38 AM

views 27

हिवाळी अधिवेशनात २० विधेयक मांडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूरमध्ये होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनात सर्व मुद्दयावर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, विरोधकांनी सभागृहात चर्चा करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसंच, हिवाळी अधिवेशनात २० विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.