January 8, 2025 7:32 PM January 8, 2025 7:32 PM

views 14

शासकीय रुग्णालयात दर्जेदार सेवा देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक दर्जेदार आणि अद्ययावत सेवा देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. औषधं तसंच अन्नपदार्थांमधल्या भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील 100 दिवसांच्या आराखड्याचा आढावा घेताना ते मुंबईत बोलत होते.  दुध भेसळ रोखणे, मंदिर आणि देवस्थानातल्या प्रसादाची गुणवत्ता तपासणीची कामे प्राधान्याने करा असंही ते म्हणाले.

January 8, 2025 3:29 PM January 8, 2025 3:29 PM

views 14

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं लोकार्पण

मुंबई महानगरपालिकेनं नूतनीकरण केलेल्या भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. संग्रहालयाच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन होत असून आपला ऐतिहासिक वारसा भावी पिढीला पाहता यावा हा संग्रहालय उभारणीचा उद्देश आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

January 7, 2025 7:40 PM January 7, 2025 7:40 PM

views 21

मुख्यमंत्र्यांचा सात कलमी कृती कार्यक्रम; सर्व सरकारी अधिकाऱ्यांना दिले आदेश

सामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन सुकर व्हावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज राज्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला. त्यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या शंभर दिवसांत प्राधान्यानं करायच्या कामांबाबत सविस्तर सूचना प्रशासनाला दिल्या. त्यावरच्या कार्यवाहीचा आढावा येत्या १५ एप्रिलला घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.    विभाग, क...

January 6, 2025 3:41 PM January 6, 2025 3:41 PM

views 106

पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून, देशात सर्वाधिक पायाभूत विकासाची कामं राज्यात सुरू आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. राज्यात विविध ठिकाणी महारेलनं उभारलेल्या ७ उड्डाणपुलांचं नागपुरातून लोकार्पण करताना ते बोलत होते.   एका बाजूला केंद्र शासनाचे विविध प्रकल्प आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनानं हाती घेतलेले विविध प्रकल्प यातून समृध्द महाराष्ट्र घडत आहे. येत्या काळात महारेल मार्फत २०० रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाची कामं पूर्ण केली ...

January 6, 2025 10:00 AM January 6, 2025 10:00 AM

views 13

बीड हत्या प्रकरणाचं राजकारण करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

बीड जिल्ह्यातल्या हत्या प्रकरणाचं राजकारण करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणातल्या पाच आरोपींना पकडण्यात आलं असून, हत्या प्रकरणात सहभागी आणि मदत करणाऱ्यांना देखील सोडणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

January 5, 2025 7:44 PM January 5, 2025 7:44 PM

views 14

महारेलने राज्यात बांधलेल्या सात उड्डाणपुलांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

महारेलने राज्यात बांधलेल्या सात उड्डाणपुलांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज नागपूर इथं झालं. यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वाशीम, अमरावती, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका उड्डाणपुलाचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने ३७३ कोटी रुपये खर्चातून हे उड्डाणपूल बांधले आहेत.

January 5, 2025 7:27 PM January 5, 2025 7:27 PM

views 8

आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण

आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं बक्षीस वितरण आज नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी विविध स्पर्धांमधे चमकदार कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं.   महारेलने राज्यात बांधलेल्या सात उड्डाणपुलांचं लोकार्पणही आज  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात झालं. यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वाशीम, अमरावती, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका उड्डाणपुलाचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या महार...

January 4, 2025 8:31 PM January 4, 2025 8:31 PM

views 8

राज्यातल्या  प्रत्येक शहरात चित्रपटगृहांची  संख्या वाढण्याची गरज-मुख्यमंत्री

राज्यातल्या  प्रत्येक शहरात चित्रपटगृहांची  संख्या वाढण्याची गरज आहे. त्यासाठी सध्या असलेल्या एकल पडदा चित्रपटगृहांना काही सवलती देता येतील का, तसंच मराठी नाटक आणि चित्रपट एकाच ठिकाणी दाखवता येतील का याबाबत विचार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. नगरविकास विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या कामकाज नियोजनाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या  विविध नियोजन प्राधिकरणांचं सक्षमीकरण करुन त्यांचं कामकाज कंपनीच्या धर्तीवर करावं , असंही ते म्हणाले.

January 4, 2025 8:53 PM January 4, 2025 8:53 PM

views 10

शहरी भागातही कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणं राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील विशेषत: मुंबईत झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणं राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महिला आणि बालविकास विभागाला दिल्या आहेत. सह्याद्री अतिथीगृहात या विभागाच्या पुढील १०० दिवसांत करायच्या कामांचा  मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला.    लाडकी बहिण योजना राबवताना प्रत्येक टप्प्याचा आढावा घेणाऱ्या "द ईनसाईड स्टोरी ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालं. महि...

January 4, 2025 2:37 PM January 4, 2025 2:37 PM

views 76

भारतीय सेनादल हे जगातल्या सर्वोत्तम सेनादलांपैकी एक असून भूदल, नौदल आणि वायुदल अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्याला तोंड द्यायला सक्षम – मुख्यमंत्री

भारतीय सेनादल हे जगातल्या सर्वोत्तम सेनादलांपैकी एक असून भूदल, नौदल आणि वायुदल अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्याला तोंड द्यायला सक्षम आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. समर्थ भारत, सक्षम सेना या संकल्पनेअंतर्गत लष्कराच्या दक्षिण कमांडने पुण्यात आयोजित केलेल्या नो युवर आर्मी मेळाव्याच्या उद्घाटनाच्या वेळी ते काल बोलत होते. या मेळाव्यात भारतीय सैन्यदलाच्या क्षमता आणि संरक्षणक्षेत्रातले स्टार्टअप यासह नवोन्मेष क्षेत्रात सुरू असलेलं प्रचंड काम बघायला मिळत आहे, असं फडण...