December 14, 2025 7:12 PM December 14, 2025 7:12 PM
13
रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेतच राज्य सरकारनं कर्ज घेतलं असून राजकोषीय तूट तीन टक्क्याच्या आत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्य़ा मर्यादेच्या आतच राज्य सरकारनं कर्ज घेतलं असून राजकोषीय तूट तीन टक्क्यांच्या आत ठेवण्यात यश आलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला त्यांनी उत्तर दिलं. चालू आर्थिक वर्षातही राजकोषीय तूट तीन टक्क्याच्या आत ठेवण्यात यश येईल असा विश्वास व्यक्त करत, राज्य दिवाळखोरीकडे जात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.