January 22, 2026 10:04 AM

views 113

महाराष्ट्रातील सर्व मोठे सौर ऊर्जा प्रकल्प या वर्षाअखेरपर्यंत पूर्णत्वास जातील-मुख्यमंत्र्यांची दावोस बैठकीत घोषणा

महाराष्ट्रातील सर्व मोठे सौर ऊर्जा प्रकल्प या वर्षाअखेरपर्यंत पूर्णत्वास जातील अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. शेतकऱ्यांना स्थिर सौर ऊर्जा पुरवठा करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांचे आरेखन करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. दावोसमध्ये 19 ते 23 जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या 56 व्या वार्षिक बैठकीत फडणवीस सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये सहभागी झाल्यामुळे राज्याला जागतिक स्तरावरच्या व्यावसायिक घडामोडींची माहिती मिळते, त्यामधून महाराष...