November 8, 2025 3:10 PM November 8, 2025 3:10 PM

views 24

पुणे जमीन घोटाळ्यात कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही, अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पुणे जमीन घोटाळ्यात कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. नागपूर इथे आज वार्ताहरांशी ते बोलत होते. या प्रकरणात अनियमितता झाल्याचंही स्पष्ट झालं असून अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रकरणाची व्याप्ती आणि संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं ते म्हणाले.   प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे आणि या संपूर्ण व्यवहारात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित ...

September 21, 2025 9:15 AM September 21, 2025 9:15 AM

views 26

कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो – मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीतून देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. इंडियन पोलीस फाऊंडेशनच्या १०व्या स्थापना दिनानिमित्त काल मुंबईत भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना या विषयावरील चर्चासत्रात मुख्यमंत्री बोलत होते.

September 12, 2025 10:05 AM September 12, 2025 10:05 AM

views 35

राज्यात एक लाख ९ हजार कोटींचे उद्योजकता गुंतवणूक करार झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. नुकतेच राज्यात एक लाख नऊ हजार कोटींचे उद्योजकता गुंतवणूक करार करण्यात आले असून त्यातून 47 हजार तरुणांना रोजगार मिळणार आहेत', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईमध्ये दिली. इंडिया-ऑस्ट्रेलिया बिझनेस अँड कम्युनिटी अलायन्स ग्लोबल फोरम लिडर्स मीट आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह झालेल्या गोलमेज परिषदेनंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले... गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने जी आघाडी घेतली आहे. ती ...

August 27, 2025 3:53 PM August 27, 2025 3:53 PM

views 16

गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

१० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून घरोघरी तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधे गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला दिसत आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं गणेशमूर्तीची प्रतिस्थापना करुन पूजा - आरती केली. यावेळी राजभवनातले अधिकारी, कर्मचारीही सहभागी झाले. यंदाची राजभवनातली शाडूची मूर्ती नाशिक कारागृहातल्या कैद्यांनी तयार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वर्षा नि...

May 23, 2025 3:21 PM May 23, 2025 3:21 PM

views 822

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल – मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. कोल्हापूर विमानतळावर ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.    पुण्यातल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले की या प्रकरणी दोन संशयितांना  पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी मोक्का लावण्याकरिता नियम पहावे लागतील, मात्र कायद्यातून कोणीही सुटणार नाही याची काळजी घेऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं.    इचलकरंजी विधानसभा मतदारसं...

February 9, 2025 2:55 PM February 9, 2025 2:55 PM

views 39

आनंदवन प्रकल्पाला 10 कोटी रुपयांचा निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

बाबा आमटेंनी सुरू केलेल्या आनंदवन या प्रकल्पाला दहा कोटींचा कॉर्पस फंड देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेद्र फडनवीस यांनी केली. आनंदवनात महारोगी सेवा समितीच्या पंचाहत्तर वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्यात ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२७ पर्यंत देश कुष्ठरोगमुक्त करण्याचं ठरवलं आहे. आनंदवनसारख्या समाजसेवी संघटनांच्या मदतीनेच हेे साध्य करता येईल असं ते म्हणाले.   कुष्ठरोग्यांची संख्या लक्षणीयरित्या घटली असली तरी मोठ्या प्रमाणावर अजून कार्य करायचं बाकी आहे असं नमूद करत आनंदव...

September 7, 2024 3:17 PM September 7, 2024 3:17 PM

views 7

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचं आगमन भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या आजच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये मोठ्या उत्साहात झालं. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेला हा अनोखा उत्सव अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटकांचं आगमनही मुंबई - पुण्यात झालं आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक व्यापार होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आण...

August 17, 2024 2:53 PM August 17, 2024 2:53 PM

views 13

मैसूरू शहरी विकास प्राधिकरण भूखंड घोटाळा प्रकरणी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवर खटला सुरू

मैसूरू शहरी विकास प्राधिकरण भूखंड घोटाळा प्रकरणी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी दिली आहे. गेहलोत यांनी २६ जुलै रोजी सिद्धरामय्या यांना कारणे दाखवा नोटिस बजावून, त्यांच्यावर खटला का चालवण्यात येऊ नये, याची कारणं सात दिवसांच्या आत देण्याची सूचना केली होती. कर्नाटक मंत्रिमंडळानं याला विरोध केला होता आणि राज्यपाल घटनात्मक पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता. सिद्धरामय्या यांनी मैसूरू शहरी विकास प्राधिकरणाचे पर्यायी ...

August 17, 2024 10:20 AM August 17, 2024 10:20 AM

views 16

महिला बचतगट आणि महिला उद्योजकांच्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप विकसित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी उमेद, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान-एनयुएलएम, महिला आर्थिक विकास महामंडळ-माविम यांनी एकत्रित येऊन एक व्यासपीठ निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.   शहरांमध्ये बचतगटांची संख्...

August 4, 2024 1:56 PM August 4, 2024 1:56 PM

views 10

अन्य राज्यातील विद्यार्थ्यांनाही आता आयुर्वेदाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी राज्यात प्रवेश मिळणार

अन्य राज्यातून बी ए एम एस केलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुंबईत काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश दिले. या विद्यार्थ्यांना आता राज्याच्या शासकीय आणि खाजग...