November 15, 2025 3:56 PM November 15, 2025 3:56 PM

views 27

मुंबईसह महाराष्ट्रात गेले काही दिवस पहाटे आणि रात्रीच्या तापमानात घट

मुंबईसह महाराष्ट्रात गेले काही दिवस पहाटे आणि रात्रीच्या तापमानात घट दिसून येत आहे. वातावरणातला उष्मा कमी झाल्यामुळे मुंबई उपनगरी रेल्वे प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये उद्यापर्यंत थंडीची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ, माहे, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, यानम, रायलसीमा आणि अंदमान निकोबार बेटांवर पुढले दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राजधानी दिल्ली परिसरातल्या हवेच...

April 28, 2025 1:15 PM April 28, 2025 1:15 PM

views 11

देशात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता

  आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, पश्चिम बंगालच्या काही भागात आणि केरळमध्ये तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राजस्थान, पंजाब आणि हरियाणा सोडून देशाच्या सर्व भागांमध्ये तापमान सामान्य किंवा थोडंफार अधिक राहण्याची शक्यता असून नवीदिल्लीत १ मे पासून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.    झारखंडमधल्या अनेक भागांसाठी आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून येत्या १ मे पर्यंत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासाठी यल...

April 3, 2025 3:34 PM April 3, 2025 3:34 PM

views 11

राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी

राज्यातल्या अनेक भागात काल अवकाळी पाऊस झाला. रत्नागिरीत आज पहाटे अनेक ठिकाणी वीजांसह सुमारे तासभराहून अधिक काळ जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे उकाड्यातून दिलासा मिळाला असला, तरी आंबा-काजूसारख्या पिकांसाठी तो नुकसानकारक ठरणार आहे.    धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. नेर गावासह परिसरात गारपीटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.   नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गावात गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली. वादळी वारे आणि पावसामुळं काढणीस आलेल्या आणि शेतात काढून ठेवलेल्या...

February 6, 2025 7:34 PM February 6, 2025 7:34 PM

views 9

विदर्भात, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ

गेल्या चोवीस तासात, विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. तसंच मराठवाड्यात काही ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुण्यात १४ पूर्णांक ७ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.येत्या दोन दिवसांत राज्यात सर्वत्र हवामान कोरड राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.  

February 5, 2025 7:33 PM February 5, 2025 7:33 PM

views 14

गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ

गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर कोकणात काही ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक इथं १३ पूर्णांक ९ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

December 3, 2024 9:15 AM December 3, 2024 9:15 AM

फेंजल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक जिल्ह्यात ढगाळ हवामान, पिकांचं नुकसान होण्याची शक्यता

फेंजल वादळाचा प्रभाव आणि परिणाम राज्यातही दिसून येत आहे. परभणी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, परभणी आणि आसपासच्या काही भागात काल जोरदार पाऊस पडला. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हरभरा, कापूस आणि तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ हवामानामुळे तापमानात काहीशी वाढ झाली. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही सीगल पक्ष्यांचं आगमन झालं आहे. युरोपातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे परदेशी पाहुणे मालवण, देवबाग, भोगवे आदी समुद्र...