January 2, 2026 7:34 PM

views 14

बदलत्या हवामानामुळं होणारं पिकांचं नुकसान टाळणार!

बदलत्या हवामानामुळं होणारं पिकांचं नुकसान टाळता यावं, यासाठी कृषी विभाग विकसित बियाणांचे वाण तयार करणार असल्याचं, केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आज नाशिक इथं म्हणाले. ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या  तृणधान्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यासाठी योजना तयार करण्यात येणार आहेत. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा,  यासाठी कृषी  उत्पादनांचे  प्रमा...

March 31, 2025 9:00 PM

views 25

मुंबई आणि परिसरातल्या विविध भागांमधे या महिन्यात तपमानात 13 अंशपर्यंत तफावत

मुंबई आणि परिसरातल्या विविध भागांमधे या महिन्यात तपमानात १३ अंश सेल्सिअसपर्यंत तफावत दिसून आल्याचं रेस्पायरर लिव्हिंग सायन्सेसनं जारी केलेल्या विश्लेषणात नमूद केलं आहे. १ ते २२ मार्च या कालावधीत वसई पूर्व आणि घाटकोपरमधे सरासरी ३३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. तर याच काळात पवईमधे सरासरी २०  अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान होतं. हा फरक १३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. त्यावर स्थानिक बाबी विचारात घेऊन उपाययोजना केली पाहिजे, अशी अपेक्षा या विश्लेषणात व्यक्त केली आहे. तापमानातला हा फर...

January 16, 2025 7:33 PM

views 19

जागतिक हवामान बदल रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

जागतिक हवामान बदल रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आज चंद्रपूर इथं सांगितलं. हवामान बदल २०२५ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी एका अॅप ची निर्मिती करणार असल्याचं परिषदेचे संयोजक सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.