November 24, 2025 1:04 PM
523
देशाचे ५३ वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांचा शपथविधी
देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी शपथ घेतली.नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ दिली. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिरला, तसंच केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. न्यायमूर्ती सूर्यकांत संवैधानिक, आणि दिवाणी कायदेक्षेत्रातले तज्ज्ञ असून २०१९ पासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायदान करत आहेत. सरन्यायाधीशपदाचा त्यांचा कार्यकाळ १५ महिन्यांचा असेल. म...