September 12, 2024 11:47 AM September 12, 2024 11:47 AM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नागरी विमान वाहतुकीवरील दुसऱ्या आशिया-प्रशांत मंत्रीस्तरीय परिषदेला करणार संबोधित

नागरी उड्डाणाशी संबधित आयोजित दुसऱ्या आशिया प्रशांत मंत्रिस्तरीय परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, आज सहभागी होत आहेत. नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते काल या संमेलनाचं उद्घाटन झालं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या या संमेलनात प्रधानमंत्री संबोधित करतील. दरम्यान, राममोहन नायडू यांनी २०३५ पर्यंत प्रतिवर्ष ३ अब्ज प्रवाशांना विमान प्रवासात सामावून घेण्यासाठी आशिया प्रशांत उड्डयन क्षेत्राच्या प्रारुप आराखड्यात धोरणात्मक गुंतवणुकीचं आवाहन केलं आहे. २०२५ पर्यंत या क्षेत्रात महिलांचा समाव...

September 10, 2024 9:57 AM September 10, 2024 9:57 AM

views 20

नागरी विमान वाहतूक विषयक दुसऱ्या आशिया-पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषदेचे भारत करणार आयोजन

भारताच्या वतीनं नवी दिल्ली इथं 11 आणि 12 सप्टेंबर रोजी नागरी विमान वाहतूकविषयक दुसऱ्या आशिया-प्रशांत मंत्रीस्तरीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. देशांतर्गत विमान वाहतुकीत शाश्वत वाढ करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. विमानांची देखभाल, दुरुस्ती सेवा, मालवाहतूक क्षेत्रात भारत स्वतःला एक प्रमुख केंद्र म्हणून प्रस्थापित करत असून, जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ म्हण...

June 29, 2024 9:44 AM June 29, 2024 9:44 AM

views 27

नागरी विमानवाहतुकीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर

देशांतर्गत विमानवाहतुकीत भारत जगातील तिसरा देश ठरला आहे. अमेरिका आणि चीननंतर भारतानं हा मान मिळवला आहे. ऑफिशिअल एअरलाइन गाइड म्हणजे ओएजी या विमानवाहतुकीबाबत विश्लेषण करणाऱ्या संस्थेनं ही माहिती दिली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, इंडिगो आणि एअर इंडियासारख्या कंपन्यांनी त्यांच्या ताफ्यात वाढ केल्यामुळे भारताचं स्थान पुढे गेल्याचं नमूद करण्यात आलं आहे.   भारतात विमानांमधील आसनांची क्षमता एप्रिल २०१४ मध्ये ७९ लाख होती, ती एप्रिल २०२४ मध्ये एक कोटी ५५ लाख इतकी झाल्याचं ओएजीनं म्हटलं ...