March 7, 2025 1:29 PM March 7, 2025 1:29 PM
29
२०२७ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार – अमित शाह
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२७ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, याचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दल-CISF च्या ५६ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते जवानांशी बोलत होते. देशातील महत्त्वाच्या संस्थांच्या सुरक्षेत तैनात असलेलं CISF हा राष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा भाग असल्याचंही शाह म्हणाले. CISF च्या महिला तुकडीचंही शाह यांनी कौतुक केलं.