August 18, 2024 1:48 PM August 18, 2024 1:48 PM
10
सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इगा श्वियांतेक आणि यानिक सिनर मैदानात उतरतील
सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज महिला एकेरीतली अग्रमानांकित इगा श्वियांतेक आणि पुरुष एकेरीत पहिल्या क्रमांकावर असलेला यानिक सिनर हे दोघेही मैदानात उतरतील. पोलंडच्या इगासमोर बेलारूसची अरीना साबालेंकाचं आव्हान असेल, तर सिनरचा सामना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह याच्याशी होईल.