January 19, 2025 6:51 PM January 19, 2025 6:51 PM

views 4

बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्ग क्रमांक १ वर उद्यापासून सुधारित वेळापत्रक लागू होणार

सिडकोच्या बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्ग क्रमांक एक वर उद्यापासून, म्हणजेच २० जानेवारीपासून, सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी जास्त गर्दीच्या वेळेत दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे, त्यामुळे प्रवाशांना आता  थांबावं लागणार  नाही! सकाळी ६ वाजल्यापासून मेट्रो सेवा सुरू होईल, बेलापूरहून रात्री १० वाजता आणि पेंधरहून रात्री पावणेदहा वाजता शेवटची मेट्रो सुटेल.

January 16, 2025 7:56 PM January 16, 2025 7:56 PM

views 5

संजय शिरसाठ यांची सिडकोच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी

राज्य सरकारनं संजय शिरसाठ यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरुन दूर केलं आहे. त्यांची मंत्रीपदावर नियुक्ती झाल्यानं त्यांच्याकडचा हा पदभार काढून घेतल्याचं सरकारनं शासन निर्णयात म्हटलं आहे.

September 22, 2024 3:25 PM September 22, 2024 3:25 PM

views 9

कोस्टल रोडला बेलापूरमधल्या नागरिकांचा विरोध

सिडकोतर्फे बेलापूर ते खारघर दरम्यान बांधण्यात येणाऱ्या कोस्टल रोडला बेलापूरमधल्या नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. बेलापूर जेट्टीजवळ नागरिकांनी आज मानवी साखळी करत आंदोलन केलं. वन टाईम प्लॅनिंग अंतर्गत नवी मुंबई महापालिकेनं बेलापूरचा विकास केला, असं असताना सिडकोतर्फे कोस्टल रोडसाठी या भागात आखणी केल्याच्या विरोधात नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.   [video width="848" height="480" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2024/09/ि्.mp4"][/video]

September 20, 2024 8:16 AM September 20, 2024 8:16 AM

views 5

आमदार संजय शिरसाट यांनी सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

आमदार संजय शिरसाट यांनी काल नवी मुंबईतल्या सिडको भवन इथं सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. नगर नियोजन आणि विकास क्षेत्रातील अग्रगण्य प्राधिकरण ही सिडकोची ओळख कायम ठेवण्यासह सिडको विकसित करत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसंच सिडकोची इतर उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचं, शिरसाट यांनी सांगितलं.

September 17, 2024 10:20 AM September 17, 2024 10:20 AM

views 22

आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती

आमदार संजय शिरसाट यांची शहरे आणि औद्योगिक विकास महामंडळ - सिडको च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास मंत्री दर्जाच्या या पदाला असलेल्या सर्व सेवा सुविधा शिरसाट यांना उपलब्ध करून देण्याबाबत या निर्णयात सूचित करण्यात आलं आहे. हिंगोलीच्या बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी माजी खासदार हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पदाला मंत्रिपदाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. माजी खासदार आनंदराव अडसुळ यांची अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणू...