January 1, 2025 10:14 AM January 1, 2025 10:14 AM
3
नाट्यमय घडामोडींनंतर वाल्मिक कराड शरण-१४ दिवसांची सीआयडी कोठडी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसंच पवनऊर्जा प्रकरणात खंडणीचा आरोप होत असलेले वाल्मिक कराड यांना केज न्यायालयानं १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. कराड यांनी काल नाट्यमय घडामोडींनंतर पुण्यात सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली. सीआयडीने त्यांना काल रात्रीच केज न्यायालयात हजर केल्याचं, आमचे प्रतिनिधी रवी उबाळे यांनी कळवलं आहे. ‘‘काल पुण्यात सीआयडी समोर शरण आलेले वाल्मिक कराड यांना सीआयडी ने जुजबी चौकशीनंतर पुण्यातून केज इथं आणलं आणि उप जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना ...