December 14, 2024 10:19 AM December 14, 2024 10:19 AM

views 21

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग

बीड जिल्ह्यात मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग-सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ही माहिती दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ‘‘संतोष देशमुख यांचं गेल्या सोमवारी नऊ डिसेंबरला अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या गुन्ह्यातील आरोपी जयराम माणिक चाटे तसंच महेश सखाराम केदार या दोघांना, १० डिसेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीमधून तर अन्य एक आरोपी प्रतिक भिमराव घुले यास ११ डिसेंबर रोजी पुण्यातून अटक करण्यात आली.  ...