March 20, 2025 7:42 PM March 20, 2025 7:42 PM

views 6

ख्रिस्तोफर लक्सन यांनी मुंबईच्या राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाला दिली भेट

भारताच्या दौऱ्यावर असलेले न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांनी काल मुंबईच्या राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाला भेट दिली. एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन, एनएमआयसीच्या विपणन प्रमुख जयिता घोष आणि अभिनेते आनंद विजय जोशी यांनी प्रधानमंत्री लक्सन याचं स्वागत केलं.   या भेटीत १०० वर्षांचा भारतीय चित्रपटाच्या इतिहासाचं प्रदर्शन असलेल्या गुलशन महलला भेट दिली. यावेळी त्यांनी न्यूझीलंडमध्ये चित्रित झालेल्या कहो ना प्यार है या चित्रपटातल्या एका गीतावर तालही धरला.

July 20, 2024 8:30 PM July 20, 2024 8:30 PM

views 9

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. नजीकच्या भविष्यात दोन्ही देशांना नव्या उंचीवर नेण्यासाठी द्विपक्षी सहकार्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांत परस्परसंमतीनं द्विपक्षी सहकार्य करण्यावर या संवादात सहमती झाली. व्यापार आणि आर्थिक सहकार्य, पशुपालन, औषधनिर्मिती, शिक्षण आणि अंतराळ आदी क्षेत्रांचा यात समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये भारतीय प्रवाशांच्या हिताची काळजी घेतल्याबद्दल प्रधानमं...