December 25, 2024 1:53 PM December 25, 2024 1:53 PM
19
नाताळ सणाचा सर्वत्र उत्साह
देशभरात नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गोव्यामध्ये धार्मिक वातावरणात नागरिक उत्सवाचा आनंद घेत आहेत. दोडोल, केक, बेबिंका यांसारख्या गोव्याच्या स्वादिष्ट पदार्थांनी दुकानं फुलून गेली आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत ख्रिस्ती बांधवानी काल मध्यरात्री प्रार्थना गृहांमधे भक्तिमय वातावरणात येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा साजरा केला. नाताळ निमित्त शहरात आणि ख्रिस्ती वस्त्यांमध्ये सजव...