April 8, 2025 9:26 AM

views 11

चीनच्या वस्तूंवर ५० % अतिरिक्त शुल्क आकारणार असल्याची अमेरिकेची घोषणा

चीनमध्ये आयात होणाऱ्या अमेरिकी उत्पादनांवर लादण्यात आलेलं आयात शुल्क जोवर कमी केलं जात नाही, तोवर अमेरिकेत आयात होणाऱ्या चीनच्या वस्तूंवर ५० टक्के अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केली आहे. अमेरिकेच्या व्यापारी भागिदार असलेल्या सर्व देशांच्या उत्पादनांवर किमान १० टक्के कर लादण्यात येईल अशी घोषणा गेल्या बधवारी ट्रम्प यांनी केली होती. यामध्ये चिनी आयातीवर ३४ टक्के आयात शुल्क लादण्यात आलं आहे. दरम्यान, चीनमध्ये उत्पादित मालावर आयात शुल्काची वाढ करण्य...