September 17, 2024 2:11 PM September 17, 2024 2:11 PM

views 10

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकारात भारताचा प्रियांशू राजावत पहिल्या फेरीत बाद

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकारात भारताचा प्रियांशू राजावत आज पहिल्या फेरीत बाद झाला. प्रियांशूला कॅनडाच्या ब्रायन यांगने सरळ गेममध्ये पराभूत केलं. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात उद्या भारताच्या किरण जॉर्जचा सामना जपानच्या केंटा निशिमोटोशी होईल. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या सामिया इमाद फारुकी हिचा सामना स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरशी होईल. तर मालविका बनसोड हिचा सामना इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंग हिच्याशी होणार आहे.   आकर्शी कश्यप ही चिनी तैपेईच्...

September 13, 2024 1:16 PM September 13, 2024 1:16 PM

views 13

नियंत्रण रेषेवरच्या उर्वरित भागातलं सैन्य पूर्णपणे हटवण्यासाठी तत्काळ आणि दुप्पट जोमानं प्रयत्न करण्यावर भारत आणि चीन यांच्यात सहमती

नियंत्रण रेषेवरच्या उर्वरित भागातलं सैन्य पूर्णपणे हटवण्यासाठी तत्काळ आणि दुप्पट जोमानं प्रयत्न करण्यावर भारत आणि चीन यांच्यात सहमती झाली आहे. रशिया मध्ये सेंट पीटर्सबर्ग इथं झालेल्या एका बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि  चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आयोगाचे संचालक वांग यी यांच्यात यावर सहमती झाली. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध चांगले राहावेत यासाठी सीमाक्षेत्रांमध्ये शांतता प्रस्थापित करणं आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेष...

September 8, 2024 11:38 AM September 8, 2024 11:38 AM

views 11

भारत आणि चीनसारखे देश युक्रेन संघर्ष मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं वक्तव्य

भारत आणि चीनसारखे देश युक्रेन संघर्ष मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असं मत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी व्यक्त केलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सध्या सुरू असलेल्या या संघर्षावर तोडगा काढण्यासाठीच्या भारताच्या प्रयत्नांचा आवर्जून उल्लेख केला होता. त्यानंतर दोन दिवसांच्या आतच मेलोनी यांनी हे वक्तव्य केलं आहे. इटलीमधील सेर्नोबिओ इथं आयोजित अँब्रोसेट्टी फोरमच्या बैठकीच्या पार्श्र्वभूमीवर मेलोनी यांची काल युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी भेट झाली. य...

July 20, 2024 8:03 PM July 20, 2024 8:03 PM

views 18

चीन : मुसळधार पावसामुळे पूल नदीत कोसळून ११ जणांचा मृत्यू

चीनच्या उत्तरेकडे मुसळधार पावसामुळे महामार्गावरील पूल नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. शान्क्सी प्रांतात काल रात्री हा अपघात घडला. बचावकार्य सुरू आहे. महामार्गावरची सुमारे २० वाहनं आणि ३० जण या दुर्घटनेनंतर बेपत्ता आहेत.

June 19, 2024 8:41 PM June 19, 2024 8:41 PM

views 9

चीनमध्ये मुसळधार पावसामुळे १३ जणांचा मृत्यू

चीनमध्ये झालेल्या मुसळधार पाऊस,पूर आणि भूस्खलनासारख्या घटनांमध्ये किमान १३ जणांचा मृत्यू झाला. शंघान्ग इथे गेल्या २४ तासात सतत पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम सुमारे साडे सहासष्ट हजार लोकांच्या जीवनावर पडला आहे. या घटनांमध्ये कित्येक लोक बेपत्ता झाले आहेत.  

June 16, 2024 8:37 PM June 16, 2024 8:37 PM

views 38

चीनमधल्या ग्वांगशी झुआंग स्वायत्त प्रदेशातल्या २२ नद्यांना पूर

जोरदार पावसामुळे चीनमधल्या ग्वांगशी झुआंग या स्वायत्त प्रदेशातल्या २२ नद्यांना पूर आला आहे. पुराने धोक्याची पातळी ओलांडल्याचं ग्वांगशी झुआंगमधल्या ३० जलविज्ञान केंद्रांनी म्हटलं आहे. तर फुजिआन प्रांतात दरड कोसळल्यानं वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. चीनमधल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूर येण्याचा इशारा चीन सरकारने नागरिकांना दिला आहे.