January 4, 2025 2:43 PM January 4, 2025 2:43 PM

views 7

चीनमध्ये तापाच्या साथीचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला असल्याबद्दलचं वृत्त चीननं फेटाळलं

चीनमध्ये तापाच्या साथीचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला असल्याबद्दलचं वृत्त चीननं फेटाळलं आहे. यंदाच्या हिवाळ्यात श्वसनाच्या आजारांचे रुग्ण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले असल्याचंही चीननं म्हटलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी ही माहिती दिली. परदेशी नागरिकांकरिता चीनमध्ये प्रवास करणं सुरक्षित असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

January 3, 2025 8:35 PM January 3, 2025 8:35 PM

views 7

चीनमध्ये आढळलेल्या HMPV व्हायरसमुळे चितेंचं कारण नाही

चीनमध्ये आढळून आलेल्या HMPV अर्थात ह्युमन मेटा न्यूमो व्हायरसमुळं चिंता करण्याची गरज नाही. श्वसनाच्या इतर आजारांना कारणीभूत असलेल्या विषाणूंसारखा हा विषाणू आहे असं केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक अतुल गोयल यांनी म्हटलं आहे. यामुळं प्रामुख्यानं ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये फ्लू सारखी लक्षणं दिसतात. या आजाराचा सामना करण्यासाठी देशात संपूर्ण तयारी असल्याचं ते म्हणाले.

December 19, 2024 9:35 AM December 19, 2024 9:35 AM

views 14

भारत-चीन यांच्यातली विशेष प्रतिनिधींची बैठक यशस्वी

भारत आणि चीन यांच्यातली विशेष प्रतिनिधींची 23 वी बैठक काल झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी बैठकीत सहभागी झाले होते. दोन्ही देशांमधल्या सीमा भागातल्या प्रश्नांवर योग्य, व्यवहार्य आणि दोन्ही बाजूंना मान्य होईल असा पर्याय शोधून शांततेसाठी प्रयत्न करण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी राजकीय दृष्टीकोनातून चर्चा होणं महत्त्वाचं आहे या मुद्द्याचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला. त्यांनी परस्पर हिताच्या क्षेत्रिय आणि जागतिक मुद्द...

December 10, 2024 7:22 PM December 10, 2024 7:22 PM

views 21

चीनने गेल्या तीस वर्षांत आसपासच्या किनारी प्रदेशात घुसखोरी केल्याची तैवानच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती

चीनने गेल्या तीस वर्षांत आसपासच्या किनारी प्रदेशात घुसखोरी केल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. चीनच्या किनारी भागातल्या समुद्रात गेल्या २४ तासांत ४७ विमानं आणि १२ युद्धनौका आढळून आल्या आहेत. यातल्या काही युद्धनौका ओकिनावा, तैवान आणि फिलिपीन्सना जोडणाऱ्या समुद्री भागात तैनात आहेत. या नौकांची संख्या जास्त असून या युद्धनौकांमुळे चीन आणि तैवानमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

November 19, 2024 1:42 PM November 19, 2024 1:42 PM

views 14

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत बैठक

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ब्राझीलमध्ये रिओ दी जेनेरियो इथे जी ट्वेंटी शिखर परिषदेदरम्यान त्यांचे चिनीचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अलिकडेच विस्कळीत झालेल्या भारत-चीन सीमेवरच्या प्रगतीविषयी चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांच्या पुढच्या टप्प्याविषयी तसंच सध्याच्या जागतिक परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाजमाध्यमावर दिली आहे.

November 17, 2024 10:45 AM November 17, 2024 10:45 AM

views 11

चीन मधील शाळेत झालेल्या चाकू हल्ल्यात 8 जण ठार

चीन मधील शाळेत झालेल्या चाकू हल्ल्यात 8 जण ठार तर 17 जण जखमी चीन मधील जिआंगसू प्रांतातील एका शाळेत काल झालेल्या चाकू हल्ल्यात 8 जण ठार तर 17 जण जखमी झाले. जू या 21 वर्षीय संशयिताला घटनास्थळी पकडण्यात आलं असून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानं प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे आणि कमी विद्यावेतन मिळाल्याच्या रागामुळे त्याने हे कृत्य केलं असल्याची माहिती तिथल्या पोलिसांनी दिली. बचावकार्य सुरू असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. चीनमध्ये या आठवड्यात, नागरिकांवर झाले...

October 24, 2024 2:34 PM October 24, 2024 2:34 PM

views 12

भारतात शिक्षणासाठी जास्त खर्च, युनेस्कोच्या पाहणीचा निष्कर्ष

चीन किंवा जपानपेक्षा भारतात शिक्षणासाठी जास्त खर्च करण्यात येतो असं युनेस्कोच्या पाहणीत आढळलं आहे. भारतात शिक्षणावरचा खासगी आणि सरकारी खर्च आशियातल्या इतर देशांपेक्षा जास्त असल्याचं युनेस्कोच्या अहवालात म्हटलं आहे. २०१५ ते २०२४ या काळात शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरता स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या ४ पूर्णांक १ दशांश टक्के ते ४ पूर्णांक ६ दशांश टक्के खर्च भारतात करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रांनी २०३० पर्यंतच्या कालावधीसाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टांमधे म्हटलंय की राष्ट्राच्य...

October 23, 2024 1:48 PM October 23, 2024 1:48 PM

views 14

प्रधानमंत्री आज चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार

  ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने रशियातल्या कझान इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरल्या गस्तीच्या व्यवस्थेसंबंधी दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे. गेल्या पाच वर्षांत प्रधानमंत्री मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यात औपचारिक बैठक झाली नव्हती.   भारत आणि चीन यांच्यात सीमेवरच्या गस्तीसंबंधाने झालेल्या करारानंतर या देशांमधले संबंध सामान्य होतील अशी आशा संयुक्त र...

October 21, 2024 8:54 PM October 21, 2024 8:54 PM

views 19

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात करार

लडाखमधल्या पूर्व भागातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात करार झाला आहे. या करारामुळे २०२०मध्ये सुरू झालेला दोन्ही देशांमधला तणाव निवळू शकतो, असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. दोन्ही देशांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, असंही ते म्हणाले. तसंच, रशियन सैन्यात लढलेल्या भारतीयांच्या परत येण्याविषयीही मिस्री यांनी माहिती दिली. रशियातून ८५ भारतीय मायदेशी परतले आहेत आणि जवळपास २० जण अजूनही तिथेच...

October 1, 2024 2:20 PM October 1, 2024 2:20 PM

views 23

चीनसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरली परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत भारत कोणत्याही आव्हानाला सामोरं जायला तयार असल्याचं लष्करप्रमुखांचं प्रतिपादन

चीनसोबत एलएसी अर्थात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरली परिस्थिती स्थिर असली तरी सामान्य झालेली नाही असं लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत चाणक्य डिफेन्स डायलॉग या कार्यक्रमात ते आज बोलत होते. एप्रिल २०२० पूर्वी होती तशी स्थिती पूर्ववत करणं हे भारताचं उद्दिष्ट असल्याचं द्विवेदी यांनी सांगितलं. ही परिस्थिती जोपर्यंत पूर्ववत होत नाही तोपर्यंत भारत कोणत्याही स्थितीला तोंड द्यायला तयार आहे, असंही लष्करप्रमुख द्विवेदी यांनी सांगितलं.