September 28, 2024 2:37 PM

views 24

चीन खुल्या टेनिस पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा, इव्हान डोडिग यांचा सामना निकोलस जॅरी, फ्रान्सिस्को सेरंडोलो यांच्याशी होईल

चीन खुल्या टेनिस पुरुष दुहेरीत आज रोहण बोपण्णा आणि इवान डोडिग या भारत-क्रोएशिया जोडीचा सामना अर्जेंटिनाचा फ्रान्सिस्को सेरुंडोलो आणि चिलीचा निकोलस जेरी जोडीशी होणार आहे. बोपण्णाचा नियमित जोडीदार ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डननं एटीपी फाईव्ह हंड्रेड प्रकारात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

September 18, 2024 7:46 PM

views 37

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मालविका बनसोडची पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्य पदक विजेत्या चीनी खेळाडूवर मात

चीन खुली बॅडमिंटन BWF Super 1000 स्पर्धेत आज महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोडनं पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्य पदक विजेत्या ग्रेगोरिया तुंजूंग वर मात केली. तिनं २६-२४, २१-१९ अशा सरळ गेममधे ग्रेगोरियाला पराभूत केलं. आजच्या इतर सामन्यांमधे मात्र भारतीय खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नाही. एकेरीत आकर्षी कश्यप, समीया इमाद फारुखी तर दुहेरी त्रिसा ज्यॉली आणि गायत्री गोपीचंद तसंच मिश्र दुहेरीत एन सिक्कीरेड्डी आणि बी सुमीत रेड्डी पराभूत झाले.