September 20, 2024 2:07 PM

views 16

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मालविका बनसोडचा पराभव

शांगझोऊ इथे सुरू असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतलं मालविका बनसोडचं आव्हान संपुष्टात आले आहे. दोन वेळा विश्वविजेती ठरलेल्या जपानच्या आकाने यामागुची हिने मालविकाला उप उपांत्यपूर्व फेरीत दोन सलग गेममध्ये हरवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीत ४३ व्या क्रमांकावर असलेली मालविका बनसोड ही सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यानंतर उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचणारी तिसरी भारतीय महिला ठरली होती.

September 20, 2024 9:08 AM

views 16

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मालविका बनसोडचा उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश

चीनमध्ये चांगशु इथं सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मालविका बनसोड हिनं महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिनं काल जागतिक क्रमवारीत २५व्या मानांकित स्कॉटलंडच्या किर्स्टी गिलमोर हिला पराभूत केलं. उपान्त्यपूर्व फेरीत आज तिचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे.