September 21, 2025 7:58 PM September 21, 2025 7:58 PM

views 17

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारतीय जोडी उपविजेती

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधन मानावं लागलं. शेनझेन इथं आज अंतिम सामन्यात किम वॉन हो आणि सेओ सेउंग जे या कोरियाच्या जोडीनं त्यांचा २१-१९, २१-१५ असा पराभव केला.