January 2, 2026 1:32 PM January 2, 2026 1:32 PM

views 10

चीन विरोधात संरक्षण सिद्धता वाढवण्याचा तैवानचा निर्णय

चीनच्या विस्तारवादी आकांक्षांच्या विरोधात तैवानने आपल्या सार्वभौमत्वाच रक्षण करण्यासाठी संरक्षणसिद्धता वाढवण्याचा निश्चय केल्याचं तैवानच्या अध्यक्ष लाई चिंग ते यांनी म्हटलं आहे. चीनने आपल्या लष्करी सरावादरम्यान तैवानच्या दिशेने काही रॉकेट सोडल्याच्या घटनेनंतर त्यांनी हे विधान केलं आहे.   चीनच्या या कृतीमुळे तैवान आणि त्याच्या आसपासच्या  भागात विनाकारण तणाव वाढत असल्याचं अमेरिकन सरकारने म्हटलं आहे. तैवान हा  लोकशाही देश असून चीनने त्यावर लष्करी दबाव टाकू नये असं आवाहन अमेरिकेने केलं आहे.

December 29, 2025 6:47 PM December 29, 2025 6:47 PM

views 12

चीनच्या संयुक्त सेनासरावांचा तैवानकडून निषेध

तैवानच्या आसपास चीनने चालवलेल्या  संयुक्त सेनासरावांचा तैवानने निषेध केला आहे. तैवानच्या संरक्षम मंत्रालयाने समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे म्हटलंय की चिनी सैन्याच्या या कवायती आंतरराष्ट्रीय प्रथांचं उल्लंघन असून शेजारी देशांना सैन्यबळाच्या वापराने भिववण्याचा प्रकार आहे. चीनची लढाऊ विमानं आणि जहाजं तैवानबोवती दररोज घिरट्या घालत असून त्याचं प्रमाण अलिकडे  वाढलं असल्याचं तैवानच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.

November 30, 2025 3:14 PM November 30, 2025 3:14 PM

views 11

चीनमध्ये चेंगडू इथं आयटीटीएफ मिश्र सांघिक विश्व चषक स्पर्धेला सुरुवात

चीनमध्ये चेंगडू इथं आजपासून आयटीटीएफ मिश्र सांघिक विश्व चषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या सामन्यांसाठी भारताच्या आठ टेबलटेनिस खेळाडूंच्या संघाचं नेतृत्व मनिका बत्रा आणि मानव ठक्कर करणार आहेत. मनिका आणि मानव राष्ट्रकुल स्पर्धेचे विजेते आहेत. भारतीय संघात  ऑलिंपियन साथिया ज्ञानसेकरनचासुद्धा समावेश आहे.    

November 10, 2025 6:29 PM November 10, 2025 6:29 PM

views 29

तैवानजवळ समुद्रात चीनने लष्करी हालचाली सुरु केल्याचं तैवानला आढळलं

तैवानजवळ समुद्रात चीनने लष्करी हालचाली सुरु केल्या असल्याचं तैवानला आढळलं आहे. चिनी सैन्याची ६ विमानं आणि नौदलाची ७ जहाजं आज सकाळी तैवानचं आखात ओलांडून गेल्याचं तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने  टिपलं असून कालही  १० विमानं आणि १० जहाजांच्या हालचाली टिपल्या , आणि त्याला प्रत्युत्तर दिलं असं तैवानने म्हटलं आहे. तैवान आणि चीन मधल्या आखातातली मध्यरेषा दोन्ही देशांची सरहद्द मानली जाते. मात्र अलिकडे चीनने त्याचं उल्लंघन वारंवार केल्यानं या क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे.

October 30, 2025 2:42 PM October 30, 2025 2:42 PM

views 42

चीनवरचं आयात शुल्क कमी करण्याची अमेरिकेची घोषणा

अमेरिकेनं चीनवर लादलेलं आयात शुल्क सध्याच्या ५७ टक्क्यांवरून ४७ टक्के इतकं कमी केल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज घोषित केलं. दक्षिण कोरियामध्ये बुसान इथं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर त्यांनी ही माहिती दिली. चीन अमेरिकेडून सोयाबीनची खरेदी तात्काळ सुरु करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दुर्मीळ खनिजांचा प्रश्न सोडवण्यात आला असून, चीनमधून होणाऱ्या दुर्मीळ खनिज निर्यातीत आता कोणताही अडथळा येणार नाही, असं ते म्हणाले. चीनवर लावलेलं रासायनिक पदार्थांवरचं सीमाशु...

July 29, 2025 2:38 PM July 29, 2025 2:38 PM

views 23

चीनमधे बिजींग इथं झालेल्या जोरदार पावसामुळे ३० जणांचा बळी

चीनमधे बिजींग इथं झालेल्या जोरदार पावसामुळे किमान ३० जणांचा मृत्यू झाला. बिजींगच्या ईशान्येकडील मियुन आणि यांगगींग भागात विक्रमी पाऊस झाला. या दोन्ही भागातल्या ८० हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पावसामुळे ३१ महामार्ग बाधित झाले असून १३६ गावांचा वीजपुरवठा बंद पडला आहे. बिजींगच्या प्रशासनानं शहरातल्या लोकांना सतर्क राहण्याचा आणि पाण्याच्या प्रवाहापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

July 28, 2025 1:42 PM July 28, 2025 1:42 PM

views 15

अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारविषयक चर्चेची नवी फेरी

अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारविषयक चर्चेची नवी फेरी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम इथं सुरू होणार आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट आणि चीनचे उपप्रधानमंत्री हे लिफेंग या चर्चेत सहभागी होतील. या दोन्ही आर्थिक महासत्तांनी त्यांच्यातलं व्यापारयुद्ध ९० दिवस थांबवायचा निर्णय घेतला होता. या तडजोडीचा १२ ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे. अमेरिकेनं काहीच दिवसांपूर्वी युरोपीय संघ आणि जपान यांच्याशी व्यापार करार केल्याच्या पार्श्वभूमीवर चीनशी ही चर्चा होत आहे.

June 27, 2025 2:06 PM June 27, 2025 2:06 PM

views 24

भारत आणि चीनमधले मतभेद कमी करून सीमावाद सोडवण्यासाठी उपाय शोधण्यावर भारताचा भर असल्याचं संरक्षणमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि चीन दरम्यान २०२०मध्ये झालेल्या सीमावादानंतर दोन्ही देशांत पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारतानं कायमच भर दिल्याचं राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षणमंत्री ॲडमिरल डोंग जुन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत सांगितलं. चीनमध्ये सुरू असलेल्या संरक्षणमंत्र्यांच्या SCO च्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांची स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत भारत-चीन सीमेवर शांतता आणि सौहार्द राखण्याची गरज अधोरेखित करत परस्पर मतभेद कमी करून सीमा वाद ...

June 24, 2025 10:41 AM June 24, 2025 10:41 AM

views 18

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली चीनच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांची भेट

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या चीनच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी बीजिंगमध्ये चिनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री वांग यी यांची भेट घेतली. आशियायी प्रदेशामध्ये शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा एकत्रितपणे सामना करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-चीन द्विपक्षीय संबंधांमधील अलीकडच्या घटनांचा आढावा घेतला आणि भारत-चीन द्विपक्षीय संबंध आणखी विकसित करण्यासाठी उभय देशातील जनतेचे परस्पर संबंध मजबूत करण्यावर भर दिला. &...

June 11, 2025 3:25 PM June 11, 2025 3:25 PM

views 28

व्यापारातला तणाव कमी करण्यासाठीच्या प्राथमिक आराखड्यावर अमेरिका आणि चीन यांच्यात सहमती

व्यापारातला तणाव कमी करण्यासाठीच्या प्राथमिक आराखड्यावर अमेरिका आणि चीन यांच्यात सहमती झाली आहे. अमेरिका आणि चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये लंडनमध्ये २ दिवस झालेल्या चर्चेनंतर ही सहमती झाली आहे. आता या व्यापार कराराचा आराखडा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.