November 28, 2024 1:14 PM November 28, 2024 1:14 PM
9
बालविवाहमुक्त भारताचं लक्ष्य असल्याचं मंत्री अन्नपूर्णा देवी यांचं प्रतिपादन
केंद्र सरकारच्या ‘बाल विवाह मुक्त भारत’ या राष्ट्रीय अभियानाचा प्रारंभ काल नवी दिल्ली इथं झाला. बालविवाहाच्या रूढीचं निर्मूलन करणं, हा या मोहिमेचा प्राथमिक उद्देश आहे. अभियानासाठी १३० जिल्ह्यांची निवड झाली असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी या मोहिमेचं उद्घाटन करताना सांगितलं. बालविवाह हा केवळ गुन्हाच नव्हे तर मानवी हक्कांचं उल्लंघन आहे असं सांगून मंत्री म्हणाल्या की, बाल विवाह मुक्त भारत मोहीम हा केवळ काही दिवसांचा कार्यक्रम नसून एक निरंतर चळवळ आहे. अन्नपूर्णा देवी...