May 29, 2025 8:23 PM May 29, 2025 8:23 PM
13
धुळे प्रशासनाने रोखला बालविवाह
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात पिंजारझाडी इथे होत असलेला बालविवाह प्रशासनाने रोखला. अनुक्रमे २० आणि १६ वर्ष वयाच्या बालक आणि बालिकेचा विवाह थांबवण्यासाठी चाईल़्ड हेल्पलाईन टीमने साक्री पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. यावेळी पालकांकडून हमीपत्रे लिहून घेण्यात आली.