December 31, 2025 3:33 PM December 31, 2025 3:33 PM
7
चिखलदरा इथल्या अंबादेवी संस्थानाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन विनामूल्य
अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा इथल्या अंबादेवी संस्थानाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन विनामूल्य दिली जाणार आहे. राज्य मंत्रीमंडळानं याला आज मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. पर्यटन महामंडळाची ही जमीन वापराविना पडून होती. त्यामुळं संस्थानानं या जमिनीची मागणी केली होती.