May 30, 2025 2:59 PM May 30, 2025 2:59 PM
10
संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान तीन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर
देशाचे संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान तीन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर असून ते २२ व्या शांग्री-ला संवाद परिषदेत सहभागी होणार आहेत. या महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत जगभरातले संरक्षण नेते, लष्कर प्रमुख, धोरणकर्ते आणि धोरणात्मक तज्ञ महत्त्वाच्या जागतिक आणि प्रादेशिक सुरक्षा मुद्द्यांवर एकत्रित चर्चा करतील. यावेळी चौहानदेखील विविध देशांच्या मुख्य संरक्षण अधिकाऱ्यांसोबत आणि नेत्यांबरोबर जागतिक सुरक्षा आव्हानांवर आणि परस्पर सहमत मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहेत.