October 7, 2024 8:09 PM October 7, 2024 8:09 PM

views 11

देशाच्या विकासाच्या मार्गात नक्षली कारवाया हा मोठा अडथळा – केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

नक्षलवादाने कोणाचंही भलं झालेलं नाही. नक्षलवादी मार्ग चोखाळणाऱ्या सर्वांनी मुख्य प्रवाहात येऊन शस्त्रांचा त्याग करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. देशातल्या नक्षलप्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झाली, त्यानंतर ते बोलत होते. नक्षलवादी कारवायांविरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात असून सर्व घटकांकडून सहकार्य मिळाल्यास मार्च २०२६ पर्यंत देश पूर्णपणे नक्षलमुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, ...