October 6, 2024 6:44 PM October 6, 2024 6:44 PM
27
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही,अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्वाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडावी म्हणून विरोधकांनी अनेक प्रयत्न केले, मात्र ही योजना कधीही बंद होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि विविध योजनांचा लोकार्पण सोहळा झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महिलांच्या संसाराला हातभर लावण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना आणली, असं मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने आतापर्यंत पिंक रिक्षा योजना, लेक लाडकी लखपती योजना, वयश्री योजना अशा अनेक लोककल्याण...