January 23, 2025 8:36 PM January 23, 2025 8:36 PM

views 8

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचारसभा

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचार सभा घेतली. किराडी मतदारसंघात जाहीर सभेत त्यांनी दिल्लीतले खराब रस्ते, अस्वच्छता या मुद्द्यावरून आम आदमी पार्टीवर टीका केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यावर केला. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा, उत्तराखंड मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याही प्रचारसभा झाल्या. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आज पक्...

December 25, 2024 3:34 PM December 25, 2024 3:34 PM

views 14

अटल युवा महाकुंभ आणि अटल आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन

माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी, यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा भाग म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज लखनौ इथं अटल युवा महाकुंभ आणि अटल आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन केलं. राजनाथ सिंह यांनी संध्याकाळी अटल गीत गंगा या काव्यवाचन कार्यक्रमातही हजेरी लावली. उद्या  ते  लखनौमध्ये  होणाऱ्या सुशासन दिवस कार्यक्रमातही  सहभागी होणार आहेत.

December 1, 2024 3:02 PM December 1, 2024 3:02 PM

views 8

प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा होणार

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा होणार असून ४३ कोटींहून अधिक भाविक या सोहळ्याला हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे. या भाविकांच्या सुविधेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातल्या रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. ६३ पूर्णांक १७ शतांश किमी लांबीच्या रायबरेली-प्रयागराज राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण, चार ठिकाणी चौपदरी बायपास, प्रयागराज इनर रिंग रोड फाफामाऊ इथं गंगा नद...

November 4, 2024 11:14 AM November 4, 2024 11:14 AM

views 5

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या व्यक्तिला अटक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या व्यक्तिला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 10 दिवसांच्या आत पदउतार न झाल्यास, राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणेच योगी आदित्यनाथ यांची हत्या होऊ शकते असा धमकीवजा इशारा त्यांना देण्यात आला होतं. मुंबई वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

July 26, 2024 8:04 PM July 26, 2024 8:04 PM

views 15

माजी अग्निवीरांना उत्तर प्रदेशच्या पोलीस दलात भरतीसाठी प्राधान्य – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

माजी अग्निवीरांना उत्तर प्रदेशच्या पोलीस दलात आणि प्रादेशिक सशस्त्र प्रोलीस दलात भरतीसाठी प्राधान्य देण्यात येईल असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. अग्निविरांच्या रूपानं देशाला प्रशिक्षित आणि शिस्तशीर सैनिक मिळाल्यानं फायदा होईल असंही ते म्हणाले. गेल्या १० वर्षात संरक्षण क्षेत्रात घडवून आणलेल्या बदलातून सुधारणा घडल्याचं आदित्यनाथ म्हणाले.

July 11, 2024 8:34 PM July 11, 2024 8:34 PM

views 9

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तराई जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांना भेट

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज तराई जिल्ह्यातल्या श्रावस्ती आणि बलरामपूरमधल्या पूरग्रस्त भागांना भेट देऊन पूरग्रस्तांची चौकशी केली. तर सहारनपूर जिल्ह्यामध्ये बचाव आणि मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण केलं आहे. गररा आणि खन्नौत नद्यांच्या प्रवाहात २६४ हून अधिकजणं अडकले असून १२ जिल्ह्यांतली ६३३ गावं पुराच्या तडाख्यात सापडली आहेत. तसंच हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली असून सुमारे ८ लाख लोक बाधित झाले आहेत.     मैलानी जंक्शन ते गोंडा यांना जोडणारा रेल्वे मार्ग पाण्याखाली गेला असून एल...