July 16, 2024 12:46 PM
20
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला मराठवाड्यातून लक्षणीय प्रतिसाद
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला मराठवाड्यातून लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचे निकष आता अधिक सोपे करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास कार्यालयातल्या या योजनेच्या समन्वयक सुवर्णा जाधव यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. जाधव यांची ही पूर्ण मुलाखत प्रासंगिक या सदरात उद्या बुधवारी प्रसारित केली जाणार आहे.नांदेड जिल्ह्यात या योजनेसाठी आतापर्यंत ७० हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. ...