June 29, 2024 7:18 PM June 29, 2024 7:18 PM
8
सर्वधर्मीयांच्या तीर्थक्षेत्रांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लागू करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
सर्वधर्मीयांच्या तीर्थक्षेत्रांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिलं. तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी, लवकरच नियमावली तयार करून इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागवू, असं ते म्हणाले. आमदार प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भातली लक्षवेधी सूचना मांडली होती.