January 24, 2026 6:44 PM
3
उच्च न्यायालयं ही न्यायदानाच्या प्रक्रियेतले पहारेकरी आहेत- सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत
उच्च न्यायालयं ही न्यायदानाच्या प्रक्रियेतले पहारेकरी आहेत, त्यांनी आणखी सक्रीय पद्धतीनं काम करावं, अशी अपेक्षा सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी आज व्यक्त केली. मुंबईत फली नरिमन स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. न्याय मिळण्यात उशीर होणं म्हणजे तो नाकारला जाणंच नाही, तर तो नष्ट होणं आहे, असं प्रतिपादन त्यांनी केलं. न्यायाचं भविष्य, आपण किती चांगल्या प्रकारे न्यायनिवाडा करतो यावर नाही, तर किती हुशारीनं वाद सोडवतो, यावर अवलंबून आहे, असं मत न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी मुंबई उच्च न्यायालयानं ...