May 13, 2025 2:58 PM May 13, 2025 2:58 PM

views 5

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना निवृत्त

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आज निवृत्त होत आहेत. १० नोव्हेंबर २०२४ ला त्यांनी पदभार स्वीकारला होता. निवृत्तीनंतर आपण कोणतंही लाभाचं पद स्वीकारणार नाही असं खन्ना यांनी स्पष्ट केलं असून कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत राहण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.   खन्ना यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांची शिफारस केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मान्यता दिल्यानंतर गवई सरन्यायाधीपदाची शपथ घेतली. 

October 25, 2024 5:24 PM October 25, 2024 5:24 PM

views 4

गेल्या ७५ वर्षांत सर्वोच्च न्यायालयाचं रूप बदलून ते जनतेचं न्यायालय झालं – सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड

गेल्या ७५ वर्षांत सर्वोच्च न्यायालयाचं रूप बदलून ते जनतेचं न्यायालय झालं आहे, असं प्रतिपादन विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलं आहे. देशाचं सर्वोच्च न्यायालय लोकन्यायालय म्हणून काम करतं असं उदाहरण जगात विरळच आहे असं ते म्हणाले. ही विशेष मुलाखत आज रात्री साडे नऊ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.