August 17, 2024 2:06 PM

views 21

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी डॉक्टरांचा देशव्यापी संप

कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी पश्चिम बंगाल राज्यसरकार अपराध्यांना पाठीशी घालत असून न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या ४३ डॉक्टरांची बदली तृणमूल सरकारने केली असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते शाहजाद पूनावाला यांनी केला.ते आज नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत बोलत होते. या प्रकरणी समाजमाध्यमांवर आवाज उठणाऱ्यांना पश्चिम बंगाल पोलिसांकडून धमक्या मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या घटनेच्या निषेधार्थ भारत...

August 11, 2024 1:27 PM

views 22

बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांचा राजीनामा

न्यायव्यवस्थेत सुधारणा करायच्या मागणीसाठी बांगलादेशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात विद्यार्थी, अधिवक्ता आणि इतरांनी केलेल्या निदर्शनानंतर बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी काल राजीनामा दिला. बांगलादेशचे कायदा, न्याय आणि संसदीय कामकाज सल्लागार प्राध्यापक आसिफ नजरुल यांनी समाजमाध्यमावरून ही माहिती दिली. राजीनामा पत्र कायदा मंत्रालयाकडे पोहोचलं असून, ते विनाविलंब राष्ट्रपतींना पाठवलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.   काल, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात विद्यार्थी, अधिवक्ता आणि इतर जमा ...