October 27, 2025 8:48 PM October 27, 2025 8:48 PM

views 47

सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या नावाची शिफारस

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश गवई येत्या २३ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर न्यायमूर्ती सुर्यकांत हे सरन्यायाधीशपदाची सूत्रं स्वीकारतील. या शिफारशीनंतर केंद्र सरकार त्यांच्या नावाची अधिसूचना जारी करेल. त्यानंतर न्यायमूर्ती सुर्यकांत २४ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतील. न्यायमूर्ती सुर्यकांत यांना १४ महिन्यांचा कालावधी मिळणार असून ते ९ फेब्रुवारी २०२७ रोज...

September 20, 2025 3:31 PM September 20, 2025 3:31 PM

views 21

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या दहाव्या अखिल भारतीय परिषदेचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या दहाव्या अखिल भारतीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत झालं. शासकीय अधिकाऱ्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी न्यायाधीकरण महत्त्वाचं असल्याचं न्यायमूर्ती गवई यावेळी म्हणाले. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरण आपल्या स्थापनेपासून गेल्या चार वर्षांपासून हे काम अव्याहतपणे करत आहे, असं सांगत न्यायाधीकरणाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.   न्यायाधीकरणाचा निकाल योग्य असला तर...

September 6, 2025 8:46 AM September 6, 2025 8:46 AM

views 2.5K

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांचा शपथविधी

न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राजभवन इथं झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती चंद्रशेखर यांना पदाची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.   मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यानंतर न्यायमूर्ती श्री चंद्र...

August 3, 2025 11:40 AM August 3, 2025 11:40 AM

views 16

स्वत:सोबत समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा बाबासाहेबांचा विचार आत्मसात करावा- सरन्यायाधीश भूषण गवई

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेल्या संविधानानं; सर्वांना समान संधी देणारी व्यवस्था देशात तयार केली, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथल्या डॉ आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात ते काल बोलत होते.   या कार्यक्रमाला सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई देखील उपस्थित होते. डॉक्टर आंबेडकर यांनी दिलेला सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा संदेश आचरणात आणण्याची गरज असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितलं.

July 12, 2025 8:21 PM July 12, 2025 8:21 PM

views 7

भारताची न्यायव्यवस्थेत मोठ्या सुधारणांची गरज असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचं प्रतिपादन

भारताची न्यायव्यवस्था विलक्षण आव्हानात्मक परिस्थितीत आहे आणि त्यात मोठ्या सुधारणांची गरज आहे, असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज केलं. हैदराबादमध्ये नालसार विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.   वर्षानुवर्षं चालणारे खटले आणि तुरुंगात खितपत पडलेल्या आरोपींची अवस्था ही चिंतेची बाब असल्याचंही ते म्हणाले. न्यायमूर्ती गवई यांनी भावी कायदेतज्ज्ञांना जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्याचं आवाहन केलं. परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ...

April 16, 2025 8:53 PM April 16, 2025 8:53 PM

views 24

आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची शिफारस

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केली आहे. गवई सध्या सर्वोच्च न्यायालयाचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती खन्ना १३ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहे. मंत्रालयाच्या मंजुरीनंतर न्यायमूर्ती गवई हे भारताचे ५२ वे सरन्यायाधीश होतील.

January 15, 2025 2:38 PM January 15, 2025 2:38 PM

views 20

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती आलोक आराधे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींच्या बदल्या केल्या आहेत. तेलंगण उच्चन्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांना दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पद मिळालं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने गेल्या ७ जानेवारीला त्यांच्या बदलीची शिफारस केली होती.