April 21, 2025 4:53 PM April 21, 2025 4:53 PM

views 97

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे यांचा शपथविधी

राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली.  त्यांच्यासोबत रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर, गजानन निमदेव यांना राज्य माहिती आयुक्तपदाची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत राजभवन इथं हा शपथविधी झाला.