October 22, 2024 3:14 PM October 22, 2024 3:14 PM
6
केंद्रीय अर्थमंत्रालयाची ५ राष्ट्रीय बँकांना मुख्य महाव्यवस्थापक हे पद निर्माण करण्यास मंजुरी
केंद्रीय अर्थमंत्रालयाने आणखी पाच राष्ट्रीय बँकांना मुख्य महाव्यवस्थापक हे पद निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक तसंच युको बँकेचा समावेश आहे. ज्या बँकामध्ये सीजीएम हे पद अगोदरच अस्तित्वात आहे, तिथे या पदांची संख्या वाढवण्यासही मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळं ११ राष्ट्रीयकृत बँकांमधील सीजीएम पदांची एकूण संख्या आता ८० वरून १४४ होणार आहे. ही पदसंख्येची फेररचना बँकांच्या चार सरव्यवस्थापकांमागे एक सीजीएम या गुणोत्त...