March 15, 2025 2:45 PM March 15, 2025 2:45 PM
10
मतदार यादीत फेरफार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त बैठक घेणार
मतदार यादीत फेरफार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी येत्या मंगळवारी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत केंद्रीय गृह सचिव, विधिमंडळ सचिव, तसंच आधार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत मतदार ओळखपत्र आधार ओळखपत्राला जोडण्याबाबतच्या मुद्द्यावर विस्तृत चर्चा होईल. मतदार यादी आधार ओळखपत्रांना ऐच्छिकरीत्या जोडण्याची तरतूद या संदर्भातल्या कायद्यात आहे.