November 16, 2025 7:55 PM November 16, 2025 7:55 PM
25
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या तिघांवर १५ लाख रुपयांचं बक्षीस होतं. आत्तापर्यंत तीन मृतदेह सापडले आहेत, तसंच एक रायफल, बीजीएल लॉन्चर्स, इतर शस्त्रास्त्रं आणि स्फोटकं जप्त केली आहेत. तुमालपाड भागातल्या जंगलात नक्षलवाद्यांचा वावर असल्याची खबर मिळाल्यानंतर जिल्हा राखीव दलाच्या एका पथकानं या भागात शोधमोहीम सुरू केली. सुरक्षा दलं