May 27, 2025 3:21 PM

views 24

छत्तीसगडमधे सुकमा इथं १८ नक्षलींचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या सुकमा इथं १८ नक्षलींनी आज आत्मसमर्पण केलं. दक्षिण बस्तरमधे कार्यरत असणाऱ्या बटालियन एक मधल्या चार नक्षलींचा यात समावेश आहे. नियाद नेल्लनार योजने अंतर्गत नक्षलींनी हे आत्मसमर्पण केलं. या योजनेचा लाभ त्यांना दिला जाईल, असं सुकमाचे पोलीस निरीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितलं. सर्व नक्षलींनी आत्मसमर्पण कारावं, असं आवाहन त्यांनी केलं. 

May 21, 2025 3:52 PM

views 15

छत्तीसगडमध्ये चकमकीत २० हून अधिक माओवादी ठार, एक जवान शहीद

छत्तीसगडच्या नारायणपूर, विजापूर आणि दंतेवाडा भागात सुरक्षादलांशी ५० तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या चकमकीत वीसपेक्षा जास्त माओवादी ठार झाले. यात काही कुख्यात माओवाद्यांचा समावेश असल्याची शक्यता आहे. यात एक जवान शहीद झाल्याची तर आणखी एक जवान जखमी झाल्याची माहिती छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी दिली आहे. ही कारवाई जवळपास संपल्याचं आणि या भागात मोठी शोधमोहीम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.

May 14, 2025 8:05 PM

views 14

छत्तीसगढमध्ये ३१ माओवादी ठार

छत्तीसगढच्या विजापूर जिल्ह्यात करेगुट्टा इथे गेल्या २१ दिवसांपासून सुरू असलेल्या माओवादविरोधी कारवाईत ३१ माओवादी ठार झाले आहेत. यात १६ महिला माओवाद्यांचा समावेश आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी आज विजापूर इथ वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. गेल्या महिन्यात २१ तारखेपासून ते ११ मे पर्यंत चालवण्यात आलेल्या या कारवाईत एकूण २१ चकमकी झाल्या. या काळात सेल्फ लोडिंग प्रकारच्या रायफल्स, शस्त्रं तसंच साडेचारशे आयईडी जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. याश...

May 7, 2025 9:13 PM

views 15

छत्तीसगडमध्ये २२ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत २२ नक्षलवादी ठार झाले आहेत. छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात करगुट्टा टेकडीवर आज सकाळी सीआरपीएफ, जिल्हा राखीव दल, स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू झाली. नक्षलविरोधी मोहीम अद्याप सुरू आहे.

April 28, 2025 8:20 PM

views 19

छत्तीसगडमध्ये २४ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या चोवीस माओवाद्यांनी आज आत्मसमर्पण केलं. यातल्या १४ जणांवर २८ लाख ५० हजार रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. सरकारच्या पुनर्वसन योजनेनुसार आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. या वर्षात बिजापूर जिल्ह्यातल्या दोन हजार माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. 

April 24, 2025 1:25 PM

views 15

छत्तीसगढमध्ये सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत ३ माओवादी ठार

छत्तीसगढ आणि तेलंगणाच्या सीमाभागात सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत आज ३ माओवादी अतिरेकी ठार झाले. बिजापूर जिल्ह्यातल्या कारेगुट्टा टेकड्यांच्या परिसरात माओवादी संघटनांचे म्होरके लपून बसले असल्याची खबर मिळाल्यावरुन संयुक्त शोध अभियान गेले २ दिवस सुरु आहे. छत्तीसगढ, तेलंगण आणि महाराष्ट्राच्या सुरक्षा दलांचं संयुक्त पथक ही मोहीम राबवत आहे. कारेगुट्टा टेकड्यांना सुरक्षा दलांनी वेढा घातला असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी संयुक्त मोहीम असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं.

April 16, 2025 1:38 PM

views 7

छत्तीसगडमध्ये सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत २ माओवादी अतिरेकी ठार

छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशात सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत दोन माओवादी अतिरेकी मारले गेले. त्यांच्यावर १३ लाख रुपयांचं बक्षीस लावलेलं होतं. नारायणपूर आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या हद्दीवर जिल्हा राखीव सुरक्षा दलातर्फे नक्षलविरोधी मोहीम राबवण्यत येत होती. त्यादरम्यान काल रात्री ही चकमक झाल्याचं पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं. आतापर्यंत दोन अतिरेक्यांचे मृतदेह आणि एके ४७ सह शस्त्रास्त्र घटनास्थळावरुन पोलिसांना मिळाली आहेत. शोधमोहीम अद्याप सुरु आहे.

March 31, 2025 3:04 PM

views 23

छत्तीसगडमध्ये चकमकीत १ महिला माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये, दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांचं संयुक्त पथक आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक महिला माओवादी ठार झाली. रेणुका, उर्फ बानू उर्फ चैते उर्फ सरस्वती नावाच्या या नक्षलीवर २५ लाख रुपयांचं बक्षीस होतं. सुरक्षा दलांचं  एक संयुक्त पथक बिजापूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरच्या जंगलात नक्षलविरोधी कारवाईसाठी गेलं असताना आज सकाळी ही चकमक झाली. घटनास्थळावरून एक रायफल आणि काही स्फोटकं  जप्त करण्यात आली असून या परिसरात शोध मोहीम सुरू आहे.  

March 30, 2025 3:20 PM

views 18

छत्तीसगडमध्ये ५० नक्षल्यांचं आत्मसर्पण

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या ५० नक्षलींनी आज आत्मसर्पण केलं. यात प्रत्येकी ६८ लाख रुपये इनाम असणाऱ्या १४ नक्षलींचा समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं. माओवादी नेत्यांकडून होणारं आदिवासींचं शोषण, पोकळ आणि अमानवी माओवादी विचारसणीमुळे आत्मसर्पण केल्याचं नक्षलींनी सांगितलं. सैन्य आणि प्रशासनाने दुर्गम खेड्यात केलेल्या सुविधांमुळे प्रभावित झाल्यामुळे या नक्षलींनी आत्मसर्पण केल्याचं पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यांनी सांगितलं.  

March 28, 2025 1:22 PM

views 36

छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेली स्फोटकं निकामी करण्यात यश

छत्तीसगढ च्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी आज सकाळी नक्षलवाद्यांनी पेरलेलं एक शक्तिशाली स्फोटक शोधून ते निकामी केलं. हे स्फोटक  ४५ किलो वजनाचं असून एका मिनी ट्रक चा विध्वंस करून जमिनीत १५ फुटांचा खड्डा पडेल इतकं  ते  शक्तिशाली होतं . केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या  २२२व्या  बटालियनने आज सकाळी एका कामगिरीवरून परत येताना हे स्फोटक  शोधून काढलं .