July 18, 2025 8:22 PM July 18, 2025 8:22 PM

views 9

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ६ माओवादी ठार

छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत ६ माओवादी ठार झाले आहेत. सुरक्षादलांनी त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात रायफली जप्त केल्या आहेत. अबुझमाड भागात दुपारी ही चकमक झाली. अजूनही काही माओवादी त्या भागात लपलेले असल्याचा संशय असून त्यांचा शोध सुरु आहे.   

July 11, 2025 8:24 PM July 11, 2025 8:24 PM

views 11

छत्तीसगडमधे २२ माओवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या नारायणपूर जिल्ह्यात आज २२ माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. या सर्वांवर मिळून सुमारे साडे सदतीस लाखाचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रॉबिन्सन गुरिया यांनी दिली.   आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदतीच्या रूपात देण्यात आले. याशिवाय त्यांच्या पुनर्वसनासाठी इतर सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

June 6, 2025 3:18 PM June 6, 2025 3:18 PM

views 7

छत्तीसगडमध्ये चकमकीत नक्षलवादी नेता ठार

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांबरोबर काल झालेल्या एका चकमकीत सुधाकर उर्फ नरसिंह चालम उर्फ गौतम हा नक्षलवादी नेता मारला गेला. त्याच्यावर १ कोटी रुपयांचं बक्षीस होतं. तसंच गेल्या तीन दशकांपासून तो महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय होता, असं छत्तीसगढच्या पोलिस महासंचालकांनी सांगितलं.

May 27, 2025 3:21 PM May 27, 2025 3:21 PM

views 12

छत्तीसगडमधे सुकमा इथं १८ नक्षलींचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या सुकमा इथं १८ नक्षलींनी आज आत्मसमर्पण केलं. दक्षिण बस्तरमधे कार्यरत असणाऱ्या बटालियन एक मधल्या चार नक्षलींचा यात समावेश आहे. नियाद नेल्लनार योजने अंतर्गत नक्षलींनी हे आत्मसमर्पण केलं. या योजनेचा लाभ त्यांना दिला जाईल, असं सुकमाचे पोलीस निरीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितलं. सर्व नक्षलींनी आत्मसमर्पण कारावं, असं आवाहन त्यांनी केलं. 

May 21, 2025 3:52 PM May 21, 2025 3:52 PM

views 5

छत्तीसगडमध्ये चकमकीत २० हून अधिक माओवादी ठार, एक जवान शहीद

छत्तीसगडच्या नारायणपूर, विजापूर आणि दंतेवाडा भागात सुरक्षादलांशी ५० तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या चकमकीत वीसपेक्षा जास्त माओवादी ठार झाले. यात काही कुख्यात माओवाद्यांचा समावेश असल्याची शक्यता आहे. यात एक जवान शहीद झाल्याची तर आणखी एक जवान जखमी झाल्याची माहिती छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी दिली आहे. ही कारवाई जवळपास संपल्याचं आणि या भागात मोठी शोधमोहीम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.

May 14, 2025 8:05 PM May 14, 2025 8:05 PM

views 3

छत्तीसगढमध्ये ३१ माओवादी ठार

छत्तीसगढच्या विजापूर जिल्ह्यात करेगुट्टा इथे गेल्या २१ दिवसांपासून सुरू असलेल्या माओवादविरोधी कारवाईत ३१ माओवादी ठार झाले आहेत. यात १६ महिला माओवाद्यांचा समावेश आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी आज विजापूर इथ वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. गेल्या महिन्यात २१ तारखेपासून ते ११ मे पर्यंत चालवण्यात आलेल्या या कारवाईत एकूण २१ चकमकी झाल्या. या काळात सेल्फ लोडिंग प्रकारच्या रायफल्स, शस्त्रं तसंच साडेचारशे आयईडी जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. याश...

May 7, 2025 9:13 PM May 7, 2025 9:13 PM

views 2

छत्तीसगडमध्ये २२ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत २२ नक्षलवादी ठार झाले आहेत. छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात करगुट्टा टेकडीवर आज सकाळी सीआरपीएफ, जिल्हा राखीव दल, स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू झाली. नक्षलविरोधी मोहीम अद्याप सुरू आहे.

April 28, 2025 8:20 PM April 28, 2025 8:20 PM

views 3

छत्तीसगडमध्ये २४ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या चोवीस माओवाद्यांनी आज आत्मसमर्पण केलं. यातल्या १४ जणांवर २८ लाख ५० हजार रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. सरकारच्या पुनर्वसन योजनेनुसार आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. या वर्षात बिजापूर जिल्ह्यातल्या दोन हजार माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. 

April 24, 2025 1:25 PM April 24, 2025 1:25 PM

views 4

छत्तीसगढमध्ये सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत ३ माओवादी ठार

छत्तीसगढ आणि तेलंगणाच्या सीमाभागात सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत आज ३ माओवादी अतिरेकी ठार झाले. बिजापूर जिल्ह्यातल्या कारेगुट्टा टेकड्यांच्या परिसरात माओवादी संघटनांचे म्होरके लपून बसले असल्याची खबर मिळाल्यावरुन संयुक्त शोध अभियान गेले २ दिवस सुरु आहे. छत्तीसगढ, तेलंगण आणि महाराष्ट्राच्या सुरक्षा दलांचं संयुक्त पथक ही मोहीम राबवत आहे. कारेगुट्टा टेकड्यांना सुरक्षा दलांनी वेढा घातला असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी संयुक्त मोहीम असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं.

April 16, 2025 1:38 PM April 16, 2025 1:38 PM

views 6

छत्तीसगडमध्ये सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत २ माओवादी अतिरेकी ठार

छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशात सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत दोन माओवादी अतिरेकी मारले गेले. त्यांच्यावर १३ लाख रुपयांचं बक्षीस लावलेलं होतं. नारायणपूर आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या हद्दीवर जिल्हा राखीव सुरक्षा दलातर्फे नक्षलविरोधी मोहीम राबवण्यत येत होती. त्यादरम्यान काल रात्री ही चकमक झाल्याचं पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं. आतापर्यंत दोन अतिरेक्यांचे मृतदेह आणि एके ४७ सह शस्त्रास्त्र घटनास्थळावरुन पोलिसांना मिळाली आहेत. शोधमोहीम अद्याप सुरु आहे.