November 25, 2025 8:10 PM November 25, 2025 8:10 PM
2
छत्तीसगडमधल्या बस्तर भागातील नारायणपूर इथं २८ नक्षलवादी शरण
छत्तीसगडमधल्या बस्तर भागातील नारायणपूर इथं आज २८ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. या १९ महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण ९ लाख रुपयांचं इनाम होतं. यातल्या तिघांनी एक एसएलआर, एक आयएनएसएएस आणि एक ३०३ रायफल पोलिसांकडे सुपूर्द केली. बस्तरमधे शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. या वर्षभरात नारायणपूर जिल्ह्यात २८७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचं पोलिसांनी सांगितलं.