November 30, 2025 7:25 PM November 30, 2025 7:25 PM

views 5

छत्तीसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यात डीव्हीसीएम, एसीएम कॅडरच्या ३७ नक्षली अतिरेक्यांनी केलं आत्मसमर्पण

छत्तीसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यात आज डीव्हीसीएम, एसीएम कॅडरच्या ३७ नक्षली अतिरेक्यांनी आत्मसमर्पण केलं. यातल्या २७ जणांवर ६५ लाख रुपयांचं बक्षीस होतं. दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितलं की पूना मार्गम या अभियानाला प्रतिसाद देत शेकडो नक्षली मुख्य प्रवाहात येत आहेत. या सर्वांना छत्तीसगढ राज्यसरकारतर्फे प्रत्येकी ५० हजार रुपयांचं त्वरित अर्थसहाय्य, कौशल्य प्रशिक्षण, शेतजमीन आणि पुनर्वसनासाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. गेल्या २३ महिन्यात छत्तीसगढमधे बावीसशे पेक्षा जास्त नक्षली अतिर...

September 12, 2025 2:02 PM September 12, 2025 2:02 PM

views 15

छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलं आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ माओवादी ठार

छत्तीसगढमध्ये आज सुरक्षा दलं आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. बिजापूर जिल्ह्याच्या नैऋत्य भागात माओवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहिमेवेळी माओवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. त्याला प्रत्युत्तर देताना झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. घटनास्थळावरून एक रायफल आणि स्फोटकंही जप्त करण्यात आली असून शोधमोहीम अजूनही सुरू आहे.